Monday 11 November 2019

वाचन प्रेरणा दिन साजरा




श्री. शिवाजी शिक्षण दौरा संचालित या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे मा. प्राचार्य  डॉ. एन जे मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.  शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित पाहुण्याचे ग्रंथ भेट देवून स्वागत करण्यात येवून  कार्यक्रमाला  सुरवात करण्यात आली.      
.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.. संजय कटाईत होते तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा राहुल माहुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
याप्रसंगी विचार मंचावर प्रा. सुरेश गवई यांनी सामान्य माणसाला घडविण्याचे कार्य हे “वाचना मुळे घडले आहे. वाचना  मध्ये इतकी शक्ती आहे की वाचन  करून सामान्य माणूस महापुरुष झाले आहेत.  
प्रा. शाम गेडाम यांनी आपलया मनोगतामध्ये  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामानी लिहलेल्या ग्रंथामुळे देशाला दिशा मिळाली आहे  युवक वाचेल तर देश वाचेल  असे सूचित केले.  प्रा माधुरी धिवरे-राऊत यांनी वाचनामुळे  व्यक्तिमत्व विकासीत होते.  कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. रविकांत महिंदकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


The hitavada News Paper


No comments:

Post a Comment