Monday 11 November 2019

1 ऑगस्ट 2019 रोजी मा.शिक्षण मंत्री , आदिवासी विकास मंत्री व मा. संस्था अध्यक्ष व इतर सन्माननीय यांची महाविद्यालयाला भेट




वाचन प्रेरणा दिन साजरा




श्री. शिवाजी शिक्षण दौरा संचालित या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे मा. प्राचार्य  डॉ. एन जे मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.  शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित पाहुण्याचे ग्रंथ भेट देवून स्वागत करण्यात येवून  कार्यक्रमाला  सुरवात करण्यात आली.      
.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.. संजय कटाईत होते तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा राहुल माहुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
याप्रसंगी विचार मंचावर प्रा. सुरेश गवई यांनी सामान्य माणसाला घडविण्याचे कार्य हे “वाचना मुळे घडले आहे. वाचना  मध्ये इतकी शक्ती आहे की वाचन  करून सामान्य माणूस महापुरुष झाले आहेत.  
प्रा. शाम गेडाम यांनी आपलया मनोगतामध्ये  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामानी लिहलेल्या ग्रंथामुळे देशाला दिशा मिळाली आहे  युवक वाचेल तर देश वाचेल  असे सूचित केले.  प्रा माधुरी धिवरे-राऊत यांनी वाचनामुळे  व्यक्तिमत्व विकासीत होते.  कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. रविकांत महिंदकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


The hitavada News Paper


Friday 20 September 2019

युवा-भूषण स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थांनी सहभाग नोंदवावा.


विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतिने युवा-भूषण स्पर्धा परिक्षेचे आयोजन केले आहे. युवा-भूषण स्पर्धा परिक्षेत सर्व विद्यार्थांनी सहभाग नोंदवावा. 
स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे  

       1.    सहभागी विद्यार्थ्यांना श्री. शिवाजी शिक्षण संस्था कडून प्रमाणपत्र देण्यात येईल

       2.    प्रथम ३ (तीन) विद्यार्थांना महाविद्यालयीन स्तरावर स्मुर्तीचिन्ह व प्रमाणपत्र
             देवूनपुरस्कुत  करण्यात येईल

        3.    प्रथम ३ (तीन) क्रमांकाच्या विद्यार्थांना रोजी श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालय 
            अमरावती येथे श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्तरावर परिक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल.

         4.    श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्तरावर प्रथम, द्वितीय, तुर्तीय क्रमांक प्राप्त विद्यार्थांना  डॉ.
              पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती सोहळ्यात पुरस्कार देण्यात येतील.

         5.    प्रथम पुरस्कार  रु. १०,००० ,    द्वितीय पुरस्कार रु. ७०००,       तुर्तीय पुरस्कार  रु. ५000

        6. परिक्षा शुल्क  100/-रु.  असेल. 

Monday 26 August 2019

Blog व E-mail चा वापर कसा करावा : डॉ. रविकांत महिंदकर

दि. 21 ऑगस्ट 2019 रोजी या.द.व. देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथे कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांना Blog व E-mail चा वापर कसा करावा : डॉ. रविकांत महिंदकर मार्गदर्शन करताना 


माहिती तंत्रज्ञानामुळे सकारात्मक परिवर्तन घडून येत: डॉ. रविकांत महिंदकर



जनविकास शिक्षण संस्था दौरा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय येवदा येथे दिक्षारंभ –विद्यार्थी प्रेरण समारोहा मध्ये दि. २१ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी 12 वाजता  “ माहिती तंत्रज्ञान समजून घेताना ”  या विषयावर प्रमुख वक्ते डॉ. रविकांत महिंदकर यांनी विद्यार्थांना आज “ माहिती तंत्रज्ञान समजून घेताना “ या विषयावर मार्गदर्शन करताना वेब ब्लॉग व ई-मेल आय.डी. याचा वापर कसा करावा तसेच मानवाच्या विकासात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असून आपण  माहिती तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे.

Saturday 10 August 2019

डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा १२७ वा जन्मदिन सोहळा ग्रंथपाल दिन, क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस ग्रंथालय विभागात पार पडला.


  • अध्यक्षिय मनोगतामध्ये प्रा. चरणदास सोळके यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयामधील ग्रंथांचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला “वाचाल तर वाचाल” असा संदेश दिला आहे त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे  वाचनामुळे आपण आपले ध्येय गाठून आपल्याला समाजात जावून आदर्श कार्य करता येईल, तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीच्या समस्या यावर भाष्य  केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. के.. जी . सोनटक्के, यांनी क्रांती दिनाचा संघर्ष माहिती दिली. व आयोजक म्हणून प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल व श्री. महेश अवघड  विचारमंचावर उपस्थित होते.
  •             प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल यांनी प्रस्ताविकामधून ग्रंथालय शास्त्रामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथान यांनी  केलेल्या भरीव कार्याचा परिचय करून दिला त्यामुळे डॉ. एस. आर. रंगनाथान यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असे संबोधले जाते. ग्रंथालयाची संशोधना मध्ये महत्वाची भूमिका असून संशोधकांनी ग्रंथालयाचा वापर केल्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होत नाही असे संगितले.
  • प्रा. राहुल माहुरे, कु. तेजस्विनी डहाके व इतर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. सचिन काळे  यांनी केले व प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल यांनी उपस्थितांचे आभार मानले




Wednesday 7 August 2019

राज्यशास्त्र विभागा कडून कलम 370 व काश्मीर समस्या व विषयावर चर्चासत्राचे आयोजन


                                                     डॉ,प्रकाश पानतावणे आपले विचार मांडताना 

                                 चर्चासत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. जे. मेश्राम  आपले विचार मांडताना 

सूचना : ग्रथ देवाण घेवाण करण्यासाठी ग्रंथालयात B.T बाबत


वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालयातील ग्रथ देवाण घेवाण करण्यासाठी ग्रंथालयाB.T उपलब्ध आहे. तरी आपण ग्रंथालयातून दि. 31/08/2019  पर्यंत B.T.  देण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रवेश देणे सुरु आहे


Wednesday 10 July 2019

या. द. व. देशमुख कला, वाणिज्य आणि विञान महाविद्यालय तिवसा येथे रेन हार्वेस्टिंग चा यशस्वी प्रयोग

                                      हिंदुस्थान वर्तमानपतत्रा मधील 10 जुलै रोजी प्रकाशित झालेले वूत्त 

Tuesday 2 April 2019

सूचना : ग्रंथालयातील वाचन कक्षामध्येउपस्थिती नोंद वहीमध्ये नोंद करण्याबाबत




महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्ष्केत्त्र्र कर्मचारी वर्गाला सूचित करण्यात येते की आपल्या ग्रंथालयातील वाचन कक्षामध्ये आपण दररोज येवून तेथे असलेल्या उपस्थिती नोंद वहीमध्ये आपली स्वाक्षरी करावी जेणेकरून वाचन कक्षातील वाचकांची संख्या वाढेल. तसेच या पूर्वी असे निदर्शनास आले की काही प्राध्यापक वुंद एक दिवस ग्रंथालयामध्ये येवून  अनेक दिवसांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या दिसून येतात ही बाब योग्य नाही तरी आपण दररोज येवून स्वाक्षरी करावी.

सूचना : वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वर्ग व शिक्षकत्तर वर्गाला सूचित करण्यात येते कि


वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकत्तर वर्गाला सूचित करण्यात येते कि आपल्या महाविद्यालयातील संकेंतस्थळ (Web-Site) नूतनीकरण करावयाचे आहे त्याकरिता आपल्या विभागाची किंवा समितीतील सध्यस्थितीत जी माहिती संकेंतस्थळावर (Web-Site) आहे. ती माहिती आपण संकेंतस्थळा भेट देऊन बघून घ्यावी तसेच त्यामध्ये काही बदल असल्यास  किंवा सत्र 2017-18 मधील काही नवीन माहिती असेल तर आपण दि. 03 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रा. रविकांत महिंदकर यांच्याकडे जे बदल असतील ते लेखी स्वरुपात देण्यात यावे. दि. 03 सप्टेंबर 2018 पर्यंत माहिती न मिळाल्यास माहिती संकेंतस्थळावर (Web-Site) जशी आहे त्याच स्वरुपात ठेवण्यात येईल याची नोंद सर्वांनी नोंद घ्यावी.

ग्रंथालयातील ग्रंथ परत करण्याबाबत

सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते कि आपणाकडील असलेल्या ग्रंथालयातील ग्रंथ परत करून व सोबत B.T. सुद्धा जमा करण्यात यावी.

Thursday 28 February 2019

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त ग्रंथ प्रदर्शनी

व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो परंतु महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन करून विद्यार्थ्यांना ग्रंथावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला. ग्रंथ प्रदर्शनी चे अध्य्क्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एन. जे. मेश्राम होते. ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक/लेखक मा. दिनकर  दाभाडे यांच्या हस्ते झाले. 



कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. डॉ. रविकांत महिंदकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चद्रकांत करवाडीया यांनी केले. 


Sunday 3 February 2019

शिक्षण- प्रशिक्षण-रोजगार मेळाव्याचे आयोजन

या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील करियर कौन्सलिंग सेल  च्या वतीने  दि. 22 जानेवारी ला राष्टीय  रोजगार क्षमता वृद्धी मिशन  (NEES) अंतर्गत शिक्षण- प्रशिक्षण-रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते.

 

Thursday 24 January 2019

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

 या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील करियर कौन्सलिंग सेल  च्या वतीने  स्पर्धा परिक्षा केंद्रा मध्ये  “ UPSC व MPSC आयोगाच्या माध्मातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा विषयी दि. 22 जानेवारी २०१९  कार्यशाळाचे  आयोजन  करण्यात आले होते.