Friday, 19 October 2018

दि. 19 ऑक्टोबर पासून ग्रंथालय सकाळी 8 am. ते 6 pm.पर्यंत सुरु राहील

महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी वर्गाला सूचित करण्यात येते कि दि. 25 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत प्राध्यापक  वृंद काम बंद आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे दि. 25 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर चे कामकाज पूर्ण  व्हावे म्हणून दि.19 ऑक्टोबर 2018 ते 02 नोव्हेंबर 2018 पर्यंत ग्रंथालय सकाळी 8 am. ते 6 pm.पर्यंत सुरु राहील  यांची नोंद घ्यावी.

या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय, तिवसा वाचन प्रेरणा दिन साजरा

                                                       वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर 2018 


या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे स्व.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर  “ वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात आला.  शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्य्क्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एन. जे. मेश्राम  होते. कार्यक्रमाचे उद्घाटन इब्राहिम खान यांच्या हस्ते झाले.प्रमुख वक्ते मा. प्रा. डॉ. प्रकाश पानतावणे  होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. चरणदास सोळंके, प्रा. श्याम गेडाम  उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा. डॉ. रविकांत महिंदकर यांनी केले.

Thursday, 11 October 2018

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची ४६ वा पुण्यतिथी सोहळा दि.२७ सप्टेंबर २०१८श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती दौरा संचालित या.द.व.देशमुख कला व वाणिज्य महविद्यालय तिवसा येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची ४६ वा पुण्यतिथी सोहळा दि.२७ सप्टेंबर २०१८ ला दुपारी 3.00 वाजता ग्रंथालय विभागात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जे. मेश्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर प्रमुख वक्ते प्रा.डॉ. प्रकाश पानतावणे यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रंथ हे मानवाचे गुरु असून ग्रंथांचे वाचन करून आपण गुरूला मानसन्मान दिला पाहिजे त्यामुळे आपले व्क्तीमत्व विकसित होवून आपल्याला समाजाच्या समस्यांचे निराकरण करता येईल.
अध्यक्षिय मनोगतामध्ये प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयामधील ग्रंथांचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला “वाचाल तर वाचाल” असा संदेश दिला आहे त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे  वाचनामुळे आपण आपले ध्येय गाठून आपल्याला समाजात जावून आदर्श कार्य करता येईल असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एस. के. कटाईत, यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रंथालयाची संशोधना मध्ये महत्वाची भूमिका असून संशोधकांनी ग्रंथालयाचा वापर केल्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होत नाही असे संगितले. श्री. महेश अवघड  व आयोजक म्हणून प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल विचारमंचावर उपस्थित होते.