Wednesday, 10 July 2019

या. द. व. देशमुख कला, वाणिज्य आणि विञान महाविद्यालय तिवसा येथे रेन हार्वेस्टिंग चा यशस्वी प्रयोग

                                      हिंदुस्थान वर्तमानपतत्रा मधील 10 जुलै रोजी प्रकाशित झालेले वूत्त 

Tuesday, 2 April 2019

सूचना : ग्रंथालयातील वाचन कक्षामध्येउपस्थिती नोंद वहीमध्ये नोंद करण्याबाबत
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्ष्केत्त्र्र कर्मचारी वर्गाला सूचित करण्यात येते की आपल्या ग्रंथालयातील वाचन कक्षामध्ये आपण दररोज येवून तेथे असलेल्या उपस्थिती नोंद वहीमध्ये आपली स्वाक्षरी करावी जेणेकरून वाचन कक्षातील वाचकांची संख्या वाढेल. तसेच या पूर्वी असे निदर्शनास आले की काही प्राध्यापक वुंद एक दिवस ग्रंथालयामध्ये येवून  अनेक दिवसांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या दिसून येतात ही बाब योग्य नाही तरी आपण दररोज येवून स्वाक्षरी करावी.

सूचना : वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वर्ग व शिक्षकत्तर वर्गाला सूचित करण्यात येते कि


वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकत्तर वर्गाला सूचित करण्यात येते कि आपल्या महाविद्यालयातील संकेंतस्थळ (Web-Site) नूतनीकरण करावयाचे आहे त्याकरिता आपल्या विभागाची किंवा समितीतील सध्यस्थितीत जी माहिती संकेंतस्थळावर (Web-Site) आहे. ती माहिती आपण संकेंतस्थळा भेट देऊन बघून घ्यावी तसेच त्यामध्ये काही बदल असल्यास  किंवा सत्र 2017-18 मधील काही नवीन माहिती असेल तर आपण दि. 03 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रा. रविकांत महिंदकर यांच्याकडे जे बदल असतील ते लेखी स्वरुपात देण्यात यावे. दि. 03 सप्टेंबर 2018 पर्यंत माहिती न मिळाल्यास माहिती संकेंतस्थळावर (Web-Site) जशी आहे त्याच स्वरुपात ठेवण्यात येईल याची नोंद सर्वांनी नोंद घ्यावी.

ग्रंथालयातील ग्रंथ परत करण्याबाबत

सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते कि आपणाकडील असलेल्या ग्रंथालयातील ग्रंथ परत करून व सोबत B.T. सुद्धा जमा करण्यात यावी.

Thursday, 28 February 2019

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त ग्रंथ प्रदर्शनी


व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो परंतु महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन करून विद्यार्थ्यांना ग्रंथावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात आला. ग्रंथ प्रदर्शनी चे अध्य्क्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एन. जे. मेश्राम होते. ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक/लेखक मा. दिनकर  दाभाडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. डॉ. रविकांत महिंदकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चद्रकांत करवाडीया यांनी केले. 


Sunday, 3 February 2019

शिक्षण- प्रशिक्षण-रोजगार मेळाव्याचे आयोजन

या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील करियर कौन्सलिंग सेल  च्या वतीने  दि. 22 जानेवारी ला राष्टीय  रोजगार क्षमता वृद्धी मिशन  (NEES) अंतर्गत शिक्षण- प्रशिक्षण-रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते.

 

Thursday, 24 January 2019

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

 या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील करियर कौन्सलिंग सेल  च्या वतीने  स्पर्धा परिक्षा केंद्रा मध्ये  “ UPSC व MPSC आयोगाच्या माध्मातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा विषयी दि. 22 जानेवारी २०१९  कार्यशाळाचे  आयोजन  करण्यात आले होते.