Monday 26 August 2019

Blog व E-mail चा वापर कसा करावा : डॉ. रविकांत महिंदकर

दि. 21 ऑगस्ट 2019 रोजी या.द.व. देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथे कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांना Blog व E-mail चा वापर कसा करावा : डॉ. रविकांत महिंदकर मार्गदर्शन करताना 


माहिती तंत्रज्ञानामुळे सकारात्मक परिवर्तन घडून येत: डॉ. रविकांत महिंदकर



जनविकास शिक्षण संस्था दौरा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय येवदा येथे दिक्षारंभ –विद्यार्थी प्रेरण समारोहा मध्ये दि. २१ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी 12 वाजता  “ माहिती तंत्रज्ञान समजून घेताना ”  या विषयावर प्रमुख वक्ते डॉ. रविकांत महिंदकर यांनी विद्यार्थांना आज “ माहिती तंत्रज्ञान समजून घेताना “ या विषयावर मार्गदर्शन करताना वेब ब्लॉग व ई-मेल आय.डी. याचा वापर कसा करावा तसेच मानवाच्या विकासात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असून आपण  माहिती तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे.

Saturday 10 August 2019

डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा १२७ वा जन्मदिन सोहळा ग्रंथपाल दिन, क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस ग्रंथालय विभागात पार पडला.


  • अध्यक्षिय मनोगतामध्ये प्रा. चरणदास सोळके यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयामधील ग्रंथांचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला “वाचाल तर वाचाल” असा संदेश दिला आहे त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे  वाचनामुळे आपण आपले ध्येय गाठून आपल्याला समाजात जावून आदर्श कार्य करता येईल, तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीच्या समस्या यावर भाष्य  केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. के.. जी . सोनटक्के, यांनी क्रांती दिनाचा संघर्ष माहिती दिली. व आयोजक म्हणून प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल व श्री. महेश अवघड  विचारमंचावर उपस्थित होते.
  •             प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल यांनी प्रस्ताविकामधून ग्रंथालय शास्त्रामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथान यांनी  केलेल्या भरीव कार्याचा परिचय करून दिला त्यामुळे डॉ. एस. आर. रंगनाथान यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असे संबोधले जाते. ग्रंथालयाची संशोधना मध्ये महत्वाची भूमिका असून संशोधकांनी ग्रंथालयाचा वापर केल्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होत नाही असे संगितले.
  • प्रा. राहुल माहुरे, कु. तेजस्विनी डहाके व इतर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. सचिन काळे  यांनी केले व प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल यांनी उपस्थितांचे आभार मानले




Wednesday 7 August 2019

राज्यशास्त्र विभागा कडून कलम 370 व काश्मीर समस्या व विषयावर चर्चासत्राचे आयोजन


                                                     डॉ,प्रकाश पानतावणे आपले विचार मांडताना 

                                 चर्चासत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. जे. मेश्राम  आपले विचार मांडताना 

सूचना : ग्रथ देवाण घेवाण करण्यासाठी ग्रंथालयात B.T बाबत


वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालयातील ग्रथ देवाण घेवाण करण्यासाठी ग्रंथालयाB.T उपलब्ध आहे. तरी आपण ग्रंथालयातून दि. 31/08/2019  पर्यंत B.T.  देण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रवेश देणे सुरु आहे