Wednesday, 14 February 2018

विभागीय महारोजगर मेळाव्याचे आयोजन दि. 17/02/2018 रोजी

आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता , माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावती व आजीवन  अध्ययन व विस्तार विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय महारोजगर मेळाव्याचे आयोजन  दि. 17/02/2018  रोजी सकाळी 09.00 विद्यार्थी भवन  विद्यापीठ परिसर अमरावती  येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याकरिता नामांकित कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले असून या कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे. तसेच या संदर्भात काही  समस्या असल्यास प्रा. डॉ. रविकांत महिंदकर यांच्याशी संपर्क करावा. 


Friday, 6 October 2017

वाचन प्रेरणा दिन 11/10/2017 वेळ दुपारी 2.30


वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर “ वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात येत असतो परंतु या वर्षी  दि. 11 ऑक्टोबर ला साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमामध्ये “वाचाल तर वाचाल” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टाचे” उद्घाटन करण्यात येईल सर्व विध्यार्थ्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाला बुधवार दि. 11 ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता ग्रंथालयात उपस्थीत राहावे.   

Saturday, 29 July 2017

B. Sc. शाखेत प्रवेश देणे सुरु आहे

Y.D.V.D. ARTS & COMMERCE COLLEGE , TIOSA DIST. AMRAVATI येथे B. Sc. शाखेत प्रवेश देणे सुरु आहे.

Monday, 5 December 2016

सूचना

6 डिसेंबर 2016 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वान दिनानिमित्य ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये १२ तास वाचन अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थांना या उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आपली नावे प्रा. रविकांत महिंदकर व डॉ. संगीता भुयार यांच्या कडे नोंदवावे.